एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली तर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘सपनो की उडान’ च्या सप्टेंबर २०२५ च्या अंकासाठी लेख पाठविणेबाबत ncert navi delhi sapnoki udan ankasathi lekha
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
संदर्भ : एन सी ई. आर. टी. नवी दिल्ली या कार्यालयाकडील दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी प्राप्त मेल उपरोक्त संदर्भीय विषयान्वये ‘एन सी ई. आर. टी. नवी दिल्ली यांचेमार्फत प्रकाशित होणाऱ्या ‘सपनो की उडान च्या सप्टेंबर २०२५ च्या अंकासाठी आरोग्य आणि निरोगीपणा या विषयावरील लेख पाठविणेसाठी विद्यार्थी व शिक्षक यांना आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीचा विषय “निरोगी भारतासाठी आरोग्य आणि तंदुरुस्ती” असा आहे.
सपनो की उडान च्या सप्टेंबर २०२५ च्या विशेषांकासाठी आरोग्य व तंदुरुस्ती या विषयावर आधारित मौलिक, सर्जनशील आणि विचारप्रवर्तक लिखाण व कलाकृती पाठवावयाच्या आहेत.
आरोग्यदायी सवयींपासून मानसिक आरोग्य जागरूकतेपर्यंत, पारंपरिक आरोग्य पद्धतींपासून आधुनिक नवकल्पनांपर्यंत तसेच एक उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या सामूहिक उपक्रमांपर्यंत आरोग्याच्या विविध अंगांचा शोध घेणारे लेख पाठविणे अपेक्षित आहे. तसेच लेखनातून आणि कलेतून शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि भावनिक आरोग्याच्या अंगांना अधोरेखित करणे अपेक्षित आहे. उपविषयः
आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकता
योग, खेळ आणि सक्रिय जीवनशैली
बाल व किशोरवयीन विकासात आहाराचे महत्त्व
प्रतिबंधात्मक आरोग्य काळजी: लसीकरण, स्वच्छता, झोप इत्यादी
मानसिक आरोग्य व भावनिक समतोल
स्थानिक सुपरफूड्स आणि पारंपरिक आहार पद्धती
वरील विषयांवर आधारित लेखन विशेषांकात ठळकपणे प्रसिद्ध केले जाईल. तसेच विद्याथ्यर्थ्यांच्या अनुभव, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेवर आधारित इतर सर्जनशील सादरीकरणांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहेर.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
सदर लेख पाठविण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
सादरीकरणाचे प्रकार, शब्दमर्यादा व इतर तपशीलः
लेखः ८०० शब्द
कथा: ५००-८०० शब्द
कविताः १२ ३२ ओळी (कमाल २०० शब्द)
निबंध: ५०० – ८०० शब्द
संवादः ३०० ५०० शब्द
प्रवासवर्णनः ५०० – ८०० शब्द
इन्फोग्राफः प्रतिमा किंवा संकल्पना प्रति ५० शब्द
प्रश्नमंजुषा/त्रिवियाः कमाल २० प्रश्न
मनोगत/अनुभवः ५००- ८०० शब्द
नाटक: ३०० ५०० शब्द
फोटो निबंध: एक आकर्षक छायाचित्र व त्याचे २५०-३०० शब्दांचे वर्णन
चित्र/पोस्टर/चित्रकला: उच्च गुणवत्तेची (३०० dpi)
फोटोग्राफ्सः उच्च गुणवत्तेचे JPG/JPEG/PNG (३०० dpi)
टीप: कृपया सर्व साहित्य कॉपीराईट-मुक्त प्रतिमांसह वरील नमूद स्वरूपातच पाठवावयाचे आहे.
तांत्रिक मार्गदर्शक तत्त्वेः
सर्व सादरीकरणे मौलिक व अप्रकाशित असावीत.
कॉपी केलेले किंवा AI-जनरेटेड कंटेंट स्वीकारले जाणार नाही.
शब्दमर्यादा व स्वरूप कठोरपणे पाळावे.
हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत सादरीकरण स्वीकारले जातील.
टेक्स्ट सादरीकरणासाठी फॉन्ट व स्पेसिगः
> हिंदी: युनिकोड, १४ pt, १.५ स्पेसिंग
> इंग्रजी: Times New Roman, १२ pt, १.५ स्पेसिंग
इतर भारतीय भाषाः युनिकोड, १४ pt, १.५ स्पेसिंग
सामग्री माहितीपूर्ण व वाचनीय असावी.
टीप:- सपनो की उडान मध्ये एकदा लेखन प्रकाशित झालेल्या लेखक/शिक्षकांचे पुढील तीन विशेषांकाशी सादरीकरण विचारात घेतले जाणार नाही. हे नव्या लेखकांना संधी मिळावी यासाठी आहे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
सादर करताना पुढील तपशील अनिवार्य आहे:
पूर्ण नाव
वर्ग (विद्यार्थ्यांसाठी)
शाळा/संस्था नाव व पत्ता
पदनाम (शिक्षक असल्यास)
– संपर्क तपशील (ईमेल व फोन नंबर)
विद्यार्थ्यांना/शिक्षकांना त्यांचे लेख किंवा इतर साहित्य e-magazine.moe@ncert.nic.in या मेल
आय.डी. वर दि. १६ ऑगस्ट, २०२५ पर्यंत पाठविता येतील. विद्यार्थ्याने पाठविलेले लेख, चित्र यांचा विद्यार्थ्यांचे नाव, वय, संस्था यासह कोठेही, कोणत्याही स्वरुपात प्रकाशित करण्याचा अधिकार एन. सी. ई. आर. टी. नवी दिल्ली यांना असेल याबाबत विद्यार्थ्यांना कळविण्यात यावे.
तरी उपरोक्तप्रमाणे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी/शिक्षकांनी यात सहभाग घ्यावा यासाठी आपल्या अधिनस्त शाळा, महाविद्यालये यांना याबाबत अवगत करण्यात यावे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
सोबत एन. सी. ई. आर. टी. नवी दिल्ली यांचेकडील पत्र