“हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान” या संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रमाची राज्यातील सर्व शाळेत अंमलबाजावणी करणेबाबत hamara vidhyalaya hamara swabhiman gr
संदर्भ :- शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२९६/एस.डी.४ दि. २६.०८.२०२५
उपरोक्त विषयी संदर्भीय शासन पत्र व सहपत्राची प्रत या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे. (प्रत संलग्न) संदर्भीय शासन पत्रात कळविलेनुसार अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्यावतीने दि. ०१ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरातील सर्व शाळांमध्ये “हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान” हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रीयभाव, सामाजिक समरसता व शाळेतील साधन संपत्तीची काळजी घेणे, नागरी कर्तव्याचे पालन करणे हे मूल्यधिष्ठित जीवनविचार विकसित होतील. त्यामुळे महाराष्ट्रतील सर्व शाळांमध्ये (सर्व माध्यमांतून चालना-या) हा उपक्रम राबविण्याबाबत नमूद केले आहे.
सदर विषयी शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक ०१.०९.२०२५ रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान” हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात आवश्यक त्या सूचना आपल्यास्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात. तसेच ज्या जिल्ह्यांना दिनांक ०१.०९.२०२५ रोजी गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असेल, त्या जिल्हातील शाळांमध्ये सदर उपक्रम दि.०२.०९.२०२५ रोजी राबविण्याबाबत सूचित करण्यात यावे.