जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ बाबत teacher online transfer portal cadre one paripatrak
संदर्भ :- शासनाचे समक्रमांकित दि.१६.६.२०२५ रोजीचे शासन परिपत्रक.
महोदय/महोदया,
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबचे सुधारित धोरण दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयातील विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ मधील विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक, परितक्त्या/घटस्फोटीत महिला शिक्षक हे बदलीमध्ये प्राधान्य तसेच बदलीतून सुट मिळविण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे सादर करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर सविस्तर सूचना विभागाच्या दि.१६.६.२०२५ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये आपणांस देण्यात आल्या आहेत.
३. उपरोक्त परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशिल शासनास तात्काळ सादर करण्याची आपणांस विनंती आहे.