भारतीय ध्वज संहिता bhartiy dhwajsanhita tiranga

भारतीय ध्वज संहिता bhartiy dhwajsanhita tiranga

भारतीय ध्वज संहिता pdf download 

भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधीत्य करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाच प्रतीक आहे. हा तिरंगा गेल्या पाच दशकांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी सशस्त्र बलाच्या जवानांसह अनेक लोकांनी त्याचे रक्षण करण्याकरिता उदारपणाने आपले प्राण पणाला लावले आहेत.

डॉ. एस. राधाकृष्णन यांनी संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वजामधील रंगांच्या व चक्राच्या अर्थसूचकतेबद्दल विस्तृतपणे वर्णन केलेले होते. संविधान सभेने एकमताने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. डॉ. एस. राधाकृष्णन यांनी असे स्पष्ट केले की” भगवा किंवा केशरी रंग हा स्वार्थनिरपेक्ष त्यागामा दर्शक आहे. आपल्या नेत्यांनी देखील भौतिक लामांपासून तटस्थ राहिले पाहिजे आणि आपल्या कामामध्ये स्वतःला बाहून घेतले पाहिजे. मध्यभागी असलेला पांढरा रंग हा प्रकाशाचा, आपल्या आचरणात मार्गदर्शन करणाऱ्या सत्याचा मार्ग आहे. हिरवा रंग हा आपले मातीशी असलेले नाते व ज्यावर इतर सर्वांचे जीवन अवलंबून आहे अशा वनस्पती जीवनाशी असलेले आपले नाते दर्शवितो. पांढन्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र है धर्म नियमांचे चक्र आहे. जे या ध्वजाखाली काम करतात त्यांची सत्य, धर्म किंवा सदाचार ही नियंत्रक तत्त्वे असली पाहिजेत तसेच चक्र हे गतीचे दर्शक आहे. तेथे कुंठित्ततेत मृत्यू आहे. गतिमानतेत जीवन आहे. भारताने परिवर्तनाला कसलाही प्रतिरोध करू नये, त्याने गतिमान बनले पाहिजे व पुढे गेले पाहिजे. चक्र हे शांततापूर्ण परिवर्तनाच्या गतिशीलतेचे निदर्शक आहे.”

राष्ट्रध्वजाबदल सार्वत्रिक प्रेम व आदर आहे आणि त्याच्याप्रती सर्वांची निष्ठा आहे. तरीसुद्धा राष्ट्रध्वज लावण्याकरिता लागू असलेले कायदे, प्रथा व संकेत यासंबंधात केवळ लोकांमध्येच नव्हे, तर शासकीय संघटना अभिकरणे यांमध्येसुद्धा कित्येकदा जाणिवेचा स्पष्ट अभाव दिसून आलेला आहे. राष्ट्रध्वज लावण्याबाबत शासनाने, वेळोवेळी जारी केलेल्या असांविधिक सूचनांव्यतिरिक्त बोधचिन्हे प नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० (१९५० चा अधिनियन क्रमांक १२) आणि राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, १९७९ (१९७१ चा अधिनियम क्रमांक ६९) यांच्या तरतुदींद्वारे राष्ट्रध्वज लावण्याचे नियमन केले जात आहे. सर्व संबंधितांच्या मार्गदर्शनासाठी व हितासाठी, भास्तीय ध्वज संहिता, २००२ मध्ये याबाबतचे सर्व कायदे, संकेत, प्रथा सूचना एकत्रित करण्याचा एक प्रयत्न केला आहे.

भारतीय ध्वज संहिता pdf download 

सोयीसाठी भारतीय ध्वज संहिता, २००२ ची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संहितेच्या भाग एक मध्ये राष्ट्रध्यजाच्या सर्वसाधारण वर्णनाचा समावेश आहे. संहितेच्या माग दोनमध्ये जनतेतील कोणतीही व्यक्ती, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था, इत्यादींना राष्ट्रध्वज लावण्याबाबत माहिती दिलेली आहे. संहितेचा भाग तीन हा केंद्र सरकार व राज्य सरकारे आणि त्यांच्या संघटना व अभिकरणे यांनी राष्ट्ररवज लावण्यासंबंधातील आहे.

भारतीय ध्वज संहिता, २००२ ही २६ जानेवारी २००२ पासून अंमलात येत आहे आणि ती विद्यमान भारतीय ध्यज संहितेची जागा घेईल

2

भाग एक

सर्वसाधारण

१.१. राष्ट्रध्वज तीन रंगांच्या पट्टचाधा असून तो समान रुंदीच्या तीन आयताकृती पट्टचा किंवा जोड-पट्टया यांचा मिळून बनलेला असेल. सर्वांत परची पट्टी भारतीय केशरी रंगाची असेल तर खालधी पट्टी भारतीय हिरव्या रंगाची असेल मधली पट्टी पांढऱ्या रंगाची असेल व तिच्या मध्यभागी समान अंतराच्या २४ आयऱ्यांचे नेव्ही ब्ल्यू रगाचे (Navy Blue) अशोक चक्राचे चिन्ह असेल, अशोक चक्र हे विशेषकरून रिक्रन प्रिंट केलेले किंवा अन्य प्रकारे प्रिंट केलेले किंवा रटेन्सिल केलेले अथचा योग्यरीत्तीने भरतकाम केलेले असेल आणि ते ध्वजाच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी पूर्णतः दिसेल असे असेल

१.२. भारताचा राष्ट्रध्वज, हाताने कातलेल्या व हाताने विणलेल्या लोकर/सूत/ सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल.

१.३. राष्ट्रध्वज आयताकृती आकाराचा असेल ध्मजाची लांबी व उंची (संदी) याचे प्रमाण ३:२ इतके असेल.

भारतीय ध्वज संहिता pdf download 

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *