इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ eleventh standard online pravesh
शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. राज्यातील एकूण ९५२५ कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता २१५०१३० इतकी आहे.
आत्तापर्यंत इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी एकूण १४५५९४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि एकूण १२०३४१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
“ओपन टू ऑल” या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे, भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करणे, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरणे आणि प्राधान्य क्रम नोंदविण्याची सुविधा दि. ०४ व ०५ ऑगस्ट, २०२५ मध्ये देण्यात आली होती. यामध्ये एकुण कॅप फेरीअंतर्गत ३८१४२० विद्याच्यांनी प्राधानयक्रम अंतिम केलेले आहे. या फेरी मध्ये व्यवस्थापन कोटयाअंतर्गत २२८५५ इतक्या विद्याध्यौनी प्राधान्यक्रम अंतिम केलेले आहे. अल्पसंख्यांक कोटयाअंतर्गत ८४३१ इतक्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अंतिम केलेले आहे. कला शाखेसाठी ९६००३ विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेसाठी ७७४४७ विद्यार्थ्यांना, विज्ञान शाखेसाठी १७५३३४ विद्यार्थ्यांना याप्रमाणे शाखा निहाय प्राधान्यक्रम अंतिम करणाऱ्या विद्यार्थ्यांची अलॉटमेंट झालेली आहे.
दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्राधान्यक्रम अंतिम केलेल्या ३८१४२० विद्यार्थ्यांपैकी ३४८७८४ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधन्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अलॉटमेंट करण्यात आली आहे.
ओपन दें ऑल फेरीमध्ये दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी पर्यंत एकूण ३२४७६१ विद्याच्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये कॅप फेरीसाठी एकूण ३१९५८२ इतके प्रवेश झालेले आहेत. तसेच कोटामध्ये (व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटा) ५१७९ इतके प्रवेश झालेले आहेत. त्यांचा विभागनिहाय तपशील खाली तक्त्यात नमूदप्रमाणे :-
ओपन टू ऑल फेरी दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी संपली असून दिनांक १२ ऑगस्ट, २०२५ पासून सुरु होणाऱ्या “विशेष फेरी” चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील.
दिनांक १२ ऑगस्ट २०२५ ते १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत विद्यार्थी नवीन नोंदणी व भाग १ दुरुस्ती करणे. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या इच्छेनुसार (व्यवस्थापन, अल्पसंख्याक) कोटातील जागा प्रत्यार्पित करणे.
दिनांक १४ ऑगस्ट २०२५ “विशेष फेरी” साठी सायंकाळी ५.०० वाजता पोर्टलवर रिक्त जागा प्रदर्शित करणे
दिनांक १५ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ “विशेष फेरी” या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे, भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करणे, राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उतीर्ण (ATKT) विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्ज भाग-२ मध्ये प्राधान्यक्रम नोंदविणे.
“विशेष फेरी” या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अलॉटमेंट याद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जाहिर करण्यात येणार आहेत.
” विशेष फेरी” या फेरीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्याच्यांना दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.००
वाजलेपासून ते दिनांक २० ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत हा कालावधी अलॉटमेंट झालेल्या संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्याला आपला प्रवेश निश्चित करता येईल. विद्याथी/पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील, प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.