जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ online intra teacher transfer portal
महोदय,
ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दि. १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व शासनाच्या दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे एकूण ६ टप्पे राबविण्यात आले असून, त्याबाबतचे बदली आदेश मे. विन्सीस आयटी प्रा.लि., पुणे यांचेकडून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यानुसार आपल्या स्तरावरुन बदली आदेश अंमलबजावणी बाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी.
२. टप्पा क्र.६ पूर्ण झाल्यानंतर उपरोक्त शासन निर्णयातील मुद्दा क्र. १.१० मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक असल्यास, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हांतर्गत बदलीचा टप्पा क्र. ७ सुरु करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे, याबाबत संबंधित जिल्हा परिषदांनी मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांचेशी संपर्क साधून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती आहे.