- भारतात तुळशीचे महत्व:
:
भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अशी मान्यता आहे. तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे.
:
गुणकारी तुळस:
तुळशीचं पान सेवन केल्याने शरीराला कोणत्याही प्रकाराचा आजार किंवा शोक होत नाही. दररोज 4 तुळशीचे पान सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने मधुमेह, रक्त विकार, वात, पित्त, कर्करोग इतर आजार नाहीसे होतात.
:
तांब्याच्या लोट्यात एक तुळशीचं पान घालून ठेवावं. तांबा आणि तुळस दोघांमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते. दूषित पाण्यात देखील तुळस घालून पाणी शुद्ध करता येतं.
तुळशीसमोर आसन घालून काही वेळ व्यतीत केल्याने श्वास आणि अस्थमा सारख्या आजारापासून मुक्ती मिळते.
वास्तू दोष दूर करण्यासाठी तुळस अग्नी कोण ते वायव्य कोण या मधील रिकाम्या स्थानी लावणे योग्य ठरेल. तेथे जमीन नसल्यास कुंड्यात देखील तुळस लावता येईल.
तुळशीचे फायदे:
तुळशी या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत, एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे.
लहान मुलाच्या खोकल्यावर, किवा टॉनिक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुळशीच्या रसाचा पाचक म्हणून उपयोग होतो.
त्वचा विकार:
‘नायटा’ झाल्यावर तुळशीच्या पाण्याचा रस करून त्या जागी लावतात.
कानाच्या दुखण्यावर उपाय म्हणुन तुळशीच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो.
हे पण वाचा: Health tips : महत्वाची माहिती, एक वर्षापर्यंतच्या बाळाला द्या सर्व लसी, बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर…..
:
तुळस उष्णतेच्या त्रासापासून आराम देते. तुळशीचे बी पाण्यात 2 ते 6 तास पाण्यात भिजवतात. भिजलेल्या बिया दुध-साखरेबरोबर खाल्ल्यास केल्यास उष्णता कमी होते.
मधमाशी चावल्यास तुळशितील माती वापरल्यास आराम पडतो.
कीडा, मुंगी अगर डास चावल्यास तुळशीची ४-५ पाने धुवून तळहातावर तंबाखूसारखी चोळतात व निघालेला रस दंशाचे जागी लावतात,त्याने आग होणे थांबते.
तुळस मोठया प्रमाणात प्राणवायू सोडते त्यामुळे सकाळी व संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालण्याने आरोग्य उत्तम राहते.
तुळस ही जवळजवळ सर्वच आजारांवर गुणकारी आहे.
तुळशीमध्ये अॅन्टी बॅक्टेरियल तत्त्व असल्याने गालांची सुज, कोल्ड आणि ड्राय कफ नाहीसा करतो.
तुळशीची तीन-चार पाने रोज उखळत्या दुधातून घेतल्यास डोकेदुखी समुळ नष्ट होते.तुळशीच्या पाण्याचे आरोग्य मिळविण्यासाठी रोज हे पाणी रोज घ्या.
शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळशी खूप प्रभावी आहे.