:
स्वत: चा गृह व्यवसाय सुरू करण्याची अपेक्षा असलेल्या स्त्रियांना चांगली कल्पना असणे आवश्यक आहे. घरोघरी व्यवसाय करणे सुलभ, सोयीस्कर आणि कमी गुंतवणूक आहे.
आज महिला घरी असो की ऑफिसमध्ये, ती बुद्धिमान, आत्मविश्वास आणि करिअर केंद्रित आहेत. बरेच जण यशस्वी उद्योजकही झाले आहेत. काही घरातून यशस्वीरित्या स्वत: चा व्यवसाय चालवत आहेत.म्हणूनच घरगुती व्यवसाय लोकांना आकर्षित करतात. त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते आणि विक्री सुरू करण्यासाठी कमीतकमी गुंतवणूकीची आवश्यकता आहे.
वेगवेगळ्या क्षेत्राचे तसेच शिक्षित अशिक्षित महिलांसाठी व्यवसाय:
1. टयुशन घेणे :
ज्या महिला तसेच गृहिणींचे भरपुर तसेच उच्च शिक्षण झालेले असेल त्या महिला आपल्या ज्ञानाचा उपयोग करून लहान शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुला मुलींना घडविण्यासाठी,त्यांना शिकविण्यासाठी महिला घरिबसल्या ट्यूषण घेऊ शकता.
2. आँनलाईन कपडे विकने ( clothes sell business ):
आपण पाहतो की आजच्या कोरोणाच्या काळात प्रत्येक जण online shopping करतांना दिसतात. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने कपडे विकण्याचा पण महिला व्यवसाय करु शकतात. ह्यासाठी आपल्याला आपला सोशल मिडियावर भरपुर लोकांशी संपर्क निर्माण करावा लागतो.वेगवेगळे गृप तसेच पेजेस बनवुन आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करावी लागते.
आँनलाईन आपल्या मालाचे फोटो पोस्ट करावे लागतात ज्यालाही कपडे आवडले तो आपल्याशी संपर्क साधून कपडे मागवित असतो.मग आपल्याला त्या दिलेल्या पत्यावर मालाची डिलीव्हरी करू शकतो.
3. ट्रान्सलेटींग :
अशा महिला ज्यांना चांगले भाषांतर येत असते ज्या एका भाषेतील मजकुर दुसरी भाषेत भाषांतरीत तसेच अनुवादीत करू शकतात.अशा महिला ट्रान्सलेटर म्हणुन देखील काम करु शकतात.आणि हा व्यवसाय महिला घरबसल्या आँनलाईन देखील करू शकतात.अशा खुप वेबसाईट तसेच लेखक असतात ज्यांना आपले आर्टिकल एका भाषेतुन दुसरी भाषेत ट्रान्सलेट करायचे असते ज्यासाठी त्यांना ट्रान्सलेटरची आवश्यकता असते.
4. हस्तकला विक्री ऑनलाइन:
स्वतंत्ररित्या काम करणारी महिला, नोकरदार महिला, गृहिणी, माता आणि स्त्रियांसाठी गृह व्यवसाय कल्पनांमध्ये रस असणार्या प्रत्येकासाठी हस्तकला विक्री ऑनलाइन.
महिलांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी हस्तकौशल्याची वस्तू ऑनलाइन विक्री करणे ही एक अतिशय फायदेशीर व्यवसाय कल्पना आहे. जूट पिशव्या, टेराकोटा घोडे, लाकडी हस्तकला आणि बरेच काही यापासून वेगळ्या प्रकारची हस्तकलेसाठी भारतातील विविध ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
म्हणूनच, स्थानिक हस्तकलेची विक्री करणे एक चांगली व्यवसाय कल्पना आहे
5. ऑनलाइन गिफ्ट स्टोअर:
:
साध्या, गोंडस, सुंदर आणि स्वस्त भेटवस्तूंच्या वस्तूंची आवश्यकता असते. म्हणूनच, आपल्याला साध्या आणि गोंडस गोष्टी बनविण्यास आवडत असल्यास आजपासून स्त्रियांसाठी आपला परिपूर्ण ऑनलाइन व्यवसाय म्हणून याचा विचार करू शकता. सर्वात चांगला भाग म्हणजे आपण आपल्या मोकळ्या वेळेत असा व्यवसाय करु शकता.आपण ऑनलाइन गिफ्ट आयटम स्टोअर सुरू करू शकता आणि केवळ ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादने वीकु शकताा. अश्यया प्रकारे आपण विक्री केलेले प्रत्येक उत्पादन अद्वितीय असेल आणि आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच खास राहील. आपण जगभरातील कोट्यावधी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या गिफ्ट आयटम अॅमेझॉन मार्केटप्लेसवर विकू शकता.
6. लहान मुले सांभाळण्याचा व्यवसाय :
बहुतेक महिला ह्या एक तर नोकरदार असतात किंवा त्यांचा स्वताचा उद्योग व्यवसाय असतो त्यामुळे अशा महिला आपल्या लहान मुला मुलींची काळजी घेण्यासाठी एखादी स्त्री शोधत असतात जी त्यांच्या अनुपस्थितीत देखील त्यांच्या लहान बाळाची व्यवस्थित काळजी घेईन.अशा आपल्या आजुबाजु वास्तव्यास असलेल्या नोकरदार तसेच उद्योजक महिलांसाठी आपण त्यांची मुले सांभाळण्याचे काम करू शकतात.
7. जेवणाचा डब्बा तयार करणे तसेच पोहचविणे :
अशा स्त्रिया ज्यांना स्वयंपाक बनविण्याची खुप आवड आहे.आणि त्यांना पाककलेचे चांगले ज्ञान अवगत आहे अशा स्त्रिया आपल्या कलेचा वापर करून इतरांसाठी भोजन बनविण्याचा व्यवसाय करून अशा लोकांना तसेच मुला मुलींना ही सेवा देऊ शकतात जे पुरुष,मुले मुली नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी बाहेरगावी राहत आहेत आणि त्यांची जेवणाची गैरसाय होते आहे.
8. ब्लाँगिंग :
आजच्या ह्या डिजीटल युगात ब्लाँगिंग सुदधा एक चांगला आँनलाईन करता येणारा व्यवसाय आहे.ज्यात महिला आपल्याला मिळेल त्या वेळेत कंटेट लिहुन पब्लिश करू शकत असतात.किंवा कंटेट लिहिण्यासाठी अजिबातच वेळ मिळत नसेल तर एखादा कंटेट रायटर देखील ब्लाँगवर रोज कंटेट लिहिण्यासाठी लावू शकतात.आणि ह्यात आपल्याला फक्त आर्टिकल लिहुन त्याचा एसीओ करून पब्लिश करायचे असते ज्यासाठी दिवसातुन कधीही रोज एक दोन तास दिले तरी पुरेसे आहे.फक्त ह्यात आपल्याला वाचकांची आवड बघुन कंटेट लिहावे लागतात.ह्यात गुंतवणुक फक्त डोमेन होस्टिंग खरेदी करण्याची असते जो खर्च आपल्याला दर वर्षी साधारणत तीन ते पाच हजार इतका करावा लागत असतो.
9.ब्युटी पार्लर :
ब्युटी पार्लर हा एक असा व्यवसाय आहे जो महिला तसेच गृहिणी आपल्या घरातच सुरू करू शकतात.फक्त हा व्यवसाय करण्यासाठी आपणास ब्युटी पार्लर मध्ये जी कार्ये केली जातात त्या कामांचे आपल्याला आधी प्रक्षिक्षण घ्यावे लागेल मग आपण आपले स्वताचे एक ब्युटी पार्लर सुरू करू शकतात.
10. शिवणकाम करणे :
हेही वाचा: कशी कराल “पीएम किसान” योजने साठी नोंदणी
जर आपणास शिवणकाम येत असेल तर आपण आपल्या घरातच शिवणकामाचा व्यवसाय सुरू करू शकतात. आपल्याला एक शिवणयंत्र लागत असते त्याचा खर्च आपल्याला करावा लागत असतो.
11. इंटेरिअर डिझाइनिंगचे काम करणे :
अशा महिला ज्यांना इंटेरिअर डिझाइनिंगची आवड आहे.ज्यांनी इंटेरिअर डिझाइनिंगचा एखादा कोर्स देखील केला आहे त्या आपला स्वताचा इंटेरिअर डिझाइनिंगचा व्यवसाय सुरू करू शकतात.ज्यात आपल्याला लोकांच्या घरातील आतील साज सजावट तसेच डेकोरेशनचे काम बघायचे असते.