कमवा: खेकडा पालणातून महिन्याला लाखो रुपये….

 

Crab-business-update
  • कमी खर्चात परवडणारा आणि जास्त उत्पन्न काडणारा खेकडा व्यवसाय:
:
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळी, कोंबडीपालन हे व्यवसाय प्रचलित आहेत. मात्र या व्यवसायांमध्ये गुंतवणूक व कष्टही जास्त आहेत. त्या तुलनेत खेकडापालन हा एक कमी जागेत जास्त उत्पन्न काडणारा, तसेच कमी खर्चात होणारा आश्‍वासक पूरक व्यवसाय होऊ शकतो. काही शेतकऱ्यांनी हे आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखविले आहे.
आपण बाजारपेठांची पाहाणी केली तर लक्षात येईलच की,खेकड्याला अधिक मागणी आहे. खेकड्यांमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते त्याचमुळे डॉक्टरांच्या सांगण्यावरून रुग्णांकडून खेकड्याला पसंती देण्यात येते. मात्र खेकडा बाजारात फारसा उपलब्ध होत नाही. काही वेळा ग्राहकांना सर्वत्र फिरूनही ते वेळेवर मिळत नाहीत.

  • असा घ्या खेकडा पालनाचा अभ्यास:
             आपल्याला इंटरनेट वर तसेच अन्य स्रोतांमधून खेकडापालनाची तसेच मासळी बाजारपेठेत जाऊन बाजारपेठ दर यांची माहिती मिळते. आपण गोड्या पाण्यात देखील खेकडापालन व्यवसाय करू शकतो. आपण आपल्या शेतीत  15/20 फूट लांबी रुंदी चा किंवा त्याच्यापेक्षा जास्त लांबी रुंदीची टाकी बनवून,त्यामध्ये पाणी भरून ठेवावे  लागते. या टाकीत अर्धा फूट पाणी सोडून त्यात खेकडे पालन केले जाते.त्याच टाकीत तळाला माती आणि वाळू थोड्या प्रमाणात टाकली जाते.तसेच पाण्यात वाढणाऱ्या गवताचे मोठे गठ्ठेही ठेवले जाते.
  • कमी कष्टात जास्त उत्पन:
खेकडे पालनासाठी अन्य व्यवसायांपेक्षा कष्ट, जागा तसेच खर्च  देखील कमी येतो. दुसऱ्या व्यवसायाच्या तुलनेने उत्पन्न जास्त मिळते. खर्च हा छोटे खेकडे खरेदी करता आणि किरकोळ खर्च वगळता कोणताच मोठा खर्च होत नाही. कष्ट देखील फार लागतं नाही.
  • खेकड्यांचे बीज व पैदास:
अगोदर छोटे छोटे खेकडे व पिले विकत घेण्यात येतात. ती टाकीत सोडून त्यांचे संगोपन केले जाते. एक मादी सुमारे पाचशे ते एक हजार पिले देते. त्यामुळे खेकड्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. सर्वसाधारण वर्षभरानंतर खेकडा विक्रीयोग्य होतो. प्रति खेकड्याचे वजन २०० ग्रॅमपर्यंत असते. साधारण चार ते पाच खेकड्यांचे वजन एक किलोच्या आसपास भरते.
  • कसे करायचे खेकडे पालन  व्यवस्थापन पाहा :
खेकडे ठेवलेल्या टाकीतील पाणी साधारण पंधरा दिवसांतून एकदा बदलावे लागते. अन्न म्हणून काही प्रमाणात सुकट दिली जाते. घरातील शिल्लक राहिलेले अन्न किंवा भात यांचाही वापर होतो. खेकड्याना अन्न मात्र कमीच लागते. त्यामुळे त्यावरील खर्च देखील कमीच होतो. खेकडे टाकीच्या वरती येऊ नयेत म्हणून टाईल्सची व्यवस्था केली जाते.
  •  खेकडा मार्केटिंग व विक्री:
 खेकड्यांचे मार्केटिंग आपण आपल्या पद्धतीने करू शकतो, मार्केट मध्ये फिरल्याने,आपल्या व्यवसायाच्या साखळीतून किंवा  व्हॉटसॲप ग्रुपद्वारे करू शकतो थोडक्यात म्हणजे आपली मार्केटीग जास्त प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. तुम्ही तीनशे रुपये प्रति किलो दराप्रमाणे जिवंत खेकड्याची विक्री करून दिवसाला १० किलोपर्यंत खप करू शकता. नंतर ग्राहकांशी स्वतः संपर्क करून तुम्ही घरूनच खेकडे विकत देऊ शकता. या व्यवसायात सुमारे ५० ते ६० टक्के नफा होऊ शकतो.
  • खेकडा  उत्पन्न वाढले:
 आपण वेगवेगळ्या प्रकारांतून खेकडेे खाऊ शकतो, त्यांच्यामध्ये विविध प्रकारची खनिजद्रव्ये, प्रथिने आहेत. विविध विकारांवर त्यांचा उपयोग होऊ शकतो.आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर पाहतो  पाचशे रुपये प्रति किलो खेकडा भाजी डिश असा दर  आहे. तरी देखील खेकडा रेसिपीज आवडीने खाल्ले जातात.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *