महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे. याद्वारे महाराष्ट्र राज्यातील
गोविंदा पथकातील खेळाडूंना याचा लाभ होणार आहे, तर वाचा काय आहे शासनाचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली
यानुसार सरकारने गोविंदा स्पर्धेसाठी बक्षीस ठरवले आहे.त्याचबरोबर विजेत्यांना शासकीय नौकरी देण्यात
येणार आहे
तसेच दहीहंडी हा उत्सव क्रीडा प्रकारात मोडला जाणार आहे असा पण निर्णय यावेळी घेण्यात आला.
हे हि वाचा : आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक https://updatesa2z.com/2022/08/government-updates.html
खालीलप्रमाणे हि इतरही काही सुविधा मिळणार आहेत:
- जर पथकातील खेळाडूचा दहीहंडी च्या थरावरून पडून मृत्यू झाला तर त्याच्या वारसास १० लाख रुपयाचे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे
2. जर एखाद्या गोविंदाचे दहीहंडीच्या थरावरून पडून दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात अथवा दोन्ही पाय निकामी
झाले तर त्या गोविंदास ७.५० एवढे साहाय्य दिले जाणार आहे.
3. तसेच दहीहंडी थरावरून पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा शरीराचा कुठलाही एक अवयव निकामी
झाला तर ५ लाख मदत म्हणून भेटणार आहे
4. इथून पुढे गोविंदा चा विमा पण उतरविला जाईल अशी घोषना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली