15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन छोटे मराठी भाषण independence day marathi small bhashan
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,
सूर्य तळपतो प्रगतीचा…
भारतभूमीच्या पराक्रमाला,
माझा मानाचा मुजरा….
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विरा-जमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या सर्व
छोट्या देशभक्तांनो..
आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्या-साठी जमलो आहोत: सर्व प्रथम माझ्या सर्व भारतवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
आजच्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
पण हे स्वातंत्र्य आपल्या देशाला सहजासहजी मिळालेले नाही. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक देशभक्त, क्रांतिकारक आणिः स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, लाला लजपतराय, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव
व चंद्रशेखर आझाद अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले. त्या सर्व शूर देशभक्तांच्या शौर्यामूळेच आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ, साहित्य, अंतराळ संशोधन व इतर अनेक क्षेत्रांत गरुड- झेप घेतली आहे. या एकंदर प्रगतीमूळेच
भारत महासच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
तरीही भारतासमोर अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. गरीबी, भ्रष्टाचार, महागाई यांसारख्या समस्यांचे समूळ उच्चाटण झाल्या-शिकय आपला देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही.
चला तर मग… आपण सर्वजण एकत्र मिळून आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श, प्रगत व सर्वांग सुंदर देश घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करूया. शेवटी मी एवढेच म्हवेन
“रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा… जयघोष भारताचा आसमंती गुंजावा,
संकल्प पूर्वक निर्धार करूया शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की
रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा…. जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा…” एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतोः भारत माता की जय ! वंदे मातरम !
धन्यवाद !