आनंददायी शनिवार कृतिपुस्तिका इयत्ता पहिली ते आठवी anandadayi shanivar krutipustika first to eighth standard 

आनंददायी शनिवार कृतिपुस्तिका इयत्ता पहिली ते आठवी anandadayi shanivar krutipustika first to eighth standard 

आनंददायी शनिवार कृतिपस्तिका pdf download

आनंददायी उपक्रमाची उ‌द्दिष्टे :

१) विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.

२) विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करणे,

३) शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे.

४) विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.

५) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे.

६) विद्यार्थ्यांची शिक्षणात अभिरुची वाढविणे.

७) विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे.

८) विद्यार्थ्यांचे गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे.

९) विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती व नेतृत्व गुण यांचा विकास करणे.

१०) विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय व उद्योगांबाबत माहिती देणे.

११) विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे.

१२) विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व पटवून देणे.

१३) कृषीविषयक आवड व आदर निर्माण करणे. कृषीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती देणे.

१४) लोकसेवा अधिनियमबाबत जागृती निर्माण करणे,

१५) विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे.

१६) कृतिशील अध्ययनातून क्षमतापूर्ण सक्षम उत्पादक गट तयार करणे.

१७) विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे.

१८) विदयार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे,

आनंददायी शनिवार कृतिपस्तिका pdf download

आनंददायी शनिवार कार्यपद्धती :

या वर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम २०२४-२५ या वर्षापासून राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम शासनमान्य सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या उपक्रमासाठी सर्व विषयशिक्षकांनी एकत्रित कार्य करायचे आहे. आपल्या विषयांतर्गत येणाऱ्या उपक्रमांची निवड या कृतिपुस्तिका संचयिकेतून किंवा खाली निश्चित करण्यात आलेल्या आराखड्याप्रमाणे स्वतः निर्मिती करायची आहे. यासाठी उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी

कार्यपद्धतीचा आराखडा पुढीलप्रमाणे आहे.

१) उपक्रमाचे नाव

२) पूर्वनियोजन

३) विकसित होणारे कौशल्य

४) आवश्यक साधनसामग्री

५) अंमलबजावणी दरम्यानच्या कृती

शिक्षक कृती

विद्यार्थी कृती

६) संदर्भ

आनंददायी शनिवार कृतिपस्तिका pdf download

‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाच्या अपेक्षित उ‌द्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार उपक्रम अंमलबजावणीसाठी शैक्षणिक स्तरनिहाय उपक्रमांची मांडणी करण्यात आली आहे. (इयत्ता पहिली व दुसरी, इयत्ता तिसरी ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी) यासाठीचा स्तर किंवा इयत्तानिहाय शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन वर्गातील किंवा वर्गाबाहेरील कृती कराव्यात, त्यात खालील बाबींचा समावेश

१) क्षेत्रभेट

२) प्रात्यक्षिक/कृतीसह व्याख्याने

३) व्यावसायिक माहिती

४) स्वनिर्मिती

५) सर्वेक्षण

६) कलाकौशल्य

७) क्रीडाकौशल्य

८) मुलाखत

९) बौद्धिक खेळ

१०) गटांमधील नावीन्यपूर्ण कृती

आनंददायी शनिवार कृतिपस्तिका pdf download

शिक्षकांची सर्जनशीलता व कल्पकतेनुसार या यादीत भर पडू शकते.

१ ) क्षेत्रभेट य शैक्षणिक सहल या उपक्रमातील भेटी आनंददायी कृती आहेत. या भेटीच्या‌द्वारे

विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनेचे आकलन तसेच सामाजिक आणि पर्यावरणीय संवेदनशीलता विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजन आणि आयोजन करणे आवश्यक आहे. शाळांनी काही आनंददायी उपक्रम निश्चित करून त्याची सांगड सर्व विषयांशी घातली पाहिजे. यातून सर्व विषयांच्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता होणे अपेक्षित आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध कारखाने, किल्ले, वस्तुसंग्रह, वृद्धाश्रम, प्राणिसंग्रहालय, बागबगीचे, सेवा कार्यालये, गावातील शाळा, मंदिरे, ऐतिहासिक स्थळ इत्यादी ठिकाणी भेटीचे नियोजन करता येऊ शकते, परंतु या उपक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी नेमकी कोणती कौशल्ये, तसेच अध्ययन निष्पत्ती अपेक्षित आहे याची आखणी करून संबंधित उपक्रमाची पूर्वतयारी करावी.

२) प्रात्यक्षिक, कृतीसह व्याख्याने प्रात्यक्षिक व कृतीसह व्याख्याने उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये

शोधकवृत्ती, समस्या निराकरण क्षमता नवनिर्मिती, चर्चा करणे, चिकित्सक विचार करणे, वर्गीकरण करणे, विश्लेषण करणे, कारणमीमांसा करणे, निष्कर्ष काढणे इत्यादी क्षमतांना प्रात्यक्षिकां‌द्वारे वाव देता येईल. यासाठी उपलब्ध संसाधने, इच्छुक पालक, समाजातील शिक्षणक्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक व्यक्तींचे सहकार्यदेखील घेता येऊ शकते.

) व्यावसायिक माहिती मूलभूत गरजेनुसार स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या व्यवसायिकांची माहिती विदद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनमानानुसार व्यवसायात अनेक बदल होत आहेत, नवनवीन व्यवसाय उदयास येत आहेत. याची ओळख तसेच

माहिती विद्यार्थ्यांना करून देणे अपेक्षित आहे. तसेच आरोग्य व पोषण या संदर्भात संबंधित आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ तसेच अनेक व्यवसाय त्यासाठी आवश्यक क्षमता, शिक्षण, उपलब्ध संधी ही माहिती व्यावसायिक माहिती उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येऊ शकते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये इयत्ता सहावी ते आठवीदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ‘दहा दिवस दप्तराविना’ हा उपक्रम अनिवार्यपणे राबवायचा आहे. या विषयांतर्गत या उपक्रमाचे नियोजन करता येऊ शकते.

आनंददायी शनिवार कृतिपस्तिका pdf download

४) स्वनिर्मिती: विदद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला प्रेरणा देऊन हस्तकलेला वाव देण्यासाठी विविध प्रकारांचा समावेश यामध्ये घेता येईल. या उपक्रमातून परिसरातील समस्यांसंदर्भात जाणीव निर्माण करून ती निवारण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रतिकृती तयार करून स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना देता येईल. यात मातीकाम (पर्यावरणपूरक मूर्ती, खेळणी, कलाकुसरीच्या वस्तू), कागदकाम, ठसेकाम, चिकटकाम या उपक्रमांचा समावेश करता येऊ शकतो. यानंतर या वस्तूंचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी देता येऊ शकते.

५) सर्वेक्षण: सर्वेक्षणामुळे विद्यार्थ्यांना एखादया विषयाची माहिती शोधणे, संकलित करणे, प्रश्नावली तयार करणे, अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे, माहितीचे उपयोजन करणे इत्यादी गोष्टी सहज शिकता येऊ शकतात. सर्वेक्षणामध्ये विद्यार्थी व्यक्तींची मुलाखत घेऊन माहितीचे विश्लेषण करतील. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषण कौशल्य, प्रश्न तयार करण्याचे कौशल्य, प्रश्न विचारण्याचे कौशल्य, नोंदणी संकलन करणे आणि अहवाल तयार करणे इत्यादी कौशल्य विकसित होतील. या उपक्रमांतर्गत व्यावसायिक भेट, कार्यालय भेट इ. भेटीचे नियोजन करता येऊ शकते.

६) नैसर्गिक शोध/नेचर वॉक या उपक्रमातून नैसर्गिक अध्ययनातून निसर्गाबाबतची, निसर्गातील समस्या याबाबत माहिती घेण्याची संधी विद्याथ्यर्थ्यांना उपलब्ध करून देता येईल. यात वने, तलाव, नद्या, ओढे, डोंगर भ्रमंती यांद्वारे निसर्गाचे निरीक्षण करता येईल व भौगोलिक परिस्थितीचा, विविधतेचा अनुभव विद्यार्थ्यांना देता येईल. उपलब्ध झाडे, कीटक, पशु-पक्षी यांच्या निरीक्षणाद्वारे विविध ठिकाणी असणाऱ्या जैवविविधतेचे निरीक्षण करता येऊ शकते.

) कलाकौशल्य: विद्यार्थ्यांना विविध मार्गांनी मिळणारी कौतुकाची थाप किवा जे प्रोत्साहान दिले जाते त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्त व्हावेसे वाटते. विद्यार्थ्यांनी केलेले नावीन्यपूर्ण शोध यातून व्यवसाय निर्मिती होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांना नृत्य, नाट्य, संगीत हस्तकला, शिल्पकला, चित्रकला यांचा आविष्कार घडण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव देणे आवश्यक आहे.

८) क्रीडाकौशल्य : विद्यार्थ्यांमध्ये सहकार्यवृत्ती, खिलाडूवृत्ती, शारीरिक विकास, मानसिक विकास यांना वाव मिळण्याच्या उद्देशाने विविध खेळांचे, योगाच्या प्रकारांचे आयोजन शाळेमध्ये किंवा शाळेबाहेर

करणे गरजेचे आहे. खेळादरम्यान सुरक्षितता, खेळांचे नियम याबाबत माहिती देऊन उपक्रमातील खेळांचे आयोजन करावे. खेळ आनंददायी व सर्वसमावेशक असे ठेवावे. तसेच उपक्रमांमध्ये स्थानिक, पारंपरिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांचा समावेश उपलब्ध परिस्थितीनुसार करता येऊ शकतो.

९) मुलाखत : मुलाखतीचा उद्देश विद्यार्थ्यांनी प्रश्ननिर्मिती करून माहिती मिळवणे हे कौशल्य विकसित करणे आहे. मुलाखतीचा विषय लक्षात घेऊन सहज आणि सोपे प्रश्न विचारण्यासाठी प्रश्ननिर्मिती कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांनी साहाय्य करावे. मुलाखत उपक्रमासाठी परिसरातील व्यावसायिक, कलाकार, प्रसिद्ध व्यक्ती या व्यक्ती उपलब्ध होण्यासाठी आधीच नियोजन करून हा उपक्रम राबविता येऊ शकतो.

१०) बौद्धिक खेळ हे उपक्रम दैनंदिन अध्यापनात उत्साहपूर्ण, आनंददायी वातावरण निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. सर्वसाधारणपणे असे निदर्शनास येते, की जसजसा विदद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढत जातो तसा विषयांचा आशय वाढत असल्यामुळे मुलांचे खेळण्याचे प्रमाण कमी होते. या उपक्रमांतर्गत सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध सोप्या अशा मनोरंजक खेळांचे आयोजन करून बौद्धिकविकास साधला जाऊ शकतो.

आनंददायी शनिवार कृतिपस्तिका pdf download

वार्षिक कार्ययोजना विकसन :

‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शालेय स्तरावर वार्षिक नियोजन आराखडा वर्गाबाहेरील व वर्गातील उपक्रमांसाठी शिक्षकांनी तयार करावा. आराखडा तयार करत असताना खाली दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करणे गरजेचे आहे.

१) शैक्षणिक वर्षांमध्ये ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम दर शनिवारी घेणे आवश्यक आहे.

२) सर्व शिक्षकांनी एकत्र सहभागी होऊन ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाचे वार्षिक, मासिक, साप्ताहिक कार्य नियोजन तयार करावे,

३) गरजेनुसार वर्गातील आणि वर्गाबाहेरील उपक्रम एकत्रितपणे घ्यावेत.

४) विशिष्ट उ‌द्दिष्टांच्या पूर्तीसाठी निश्चित केलेल्या उपक्रमांपैकी कोणताही एक उपक्रम शिक्षकांनी राबवणे आवश्यक आहे.

५) उपक्रमाची जबाबदारी सोपवताना शिक्षकांनी उपक्रमाद्वारे अध्ययन निष्पत्ती, अपेक्षित कौशल्ये साध्य झाल्याची खात्री करावी.

६) विशेष गरजा असलेल्या विदद्यार्थ्यांसह (आवश्यक साहाय्य उपलब्ध करून) सर्व विद्यार्थ्यांचा उपक्रमात समावेश करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.

७) उपक्रम सर्जनशीलतेने आनंददायी करण्यासाठी विविध संदर्भाचा वापर करावा.

१. उपक्रमाची पूर्वतयारी :

उपक्रमाची पूर्वतयारी करत असताना विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या अध्ययन निष्पत्ती किंवा कौशल्ये निवडीसाठी उपक्रम घ्यायचा आहे हे शिक्षकांनी निश्चित करावे. उपक्रम एकत्रित घ्यायचा असेल तर सर्व विषय शिक्षकांनी एकत्रित येऊन नियोजन करावे (उदा. क्षेत्रभेट), यासाठी उपक्रम निश्चित करून त्याबाबत उपलब्ध संदर्भ साहित्याचा अभ्यास करावा. त्यानंतर कृतीसाठी आवश्यक साहित्य, अंमलबजावणी दरम्यान उपक्रमातून विकसित होणाऱ्या कौशल्यांसाठी आवश्यक कृती यांचे नियोजन करावे. उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे.

उपक्रमोत्तर कृती :

उपक्रमाची अंमलबजावणी केल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वंकष अहवाल तयार करावा. सदर उपक्रमाबाबत वार्षिक नियोजनाबाबतचा नमुना आराखडा खालीलप्रमाणे दिला आहे. प्रत्यक्ष नियोजन करत असताना स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करता येईल.

आनंददायी शनिवार कृतिपस्तिका pdf download

आनंददायी शनिवार उपक्रमासाठी मार्गदर्शक विषयसूची:

आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यासाठी खालील विषयसूचीअंतर्गत विविध कृर्तीचा शिक्षकांनी

समावेश करावा.

१) प्राणायाम/योग/ध्यानधारणा/मुक्त हालचाली.

२) आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्त्वे व व्यावहारिक प्रशिक्षण.

३) दैनंदिन जीवनातील आर्थिक साक्षरता व वित्तीय व्यवस्थापन, व्यावहारिक कौशल्ये, जीवनकौशल्ये

४) स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना, स्वसंरक्षण, आरोग्यदायी जीवनशैली

५) रस्ते सुरक्षा

६) समस्या निराकरणाची तंत्रे

७) कलाकृती, खेळ यांवर आधारित उपक्रम

८) Mindfulness वर आधारित कृती

९) नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य

१०) सामाजिक बांधिलकीसाठी समाजसेवा, श्रमदान

११) निरनिराळ्या व्यवसायांची प्राथमिक माहिती.

१२) कृषी पर्यटन

१३) जैव तंत्रज्ञान

१४) विविध प्रयोग, प्रकल्प

१५) लोकशाही मूल्ये, २१ व्या शतकातील कौशल्ये

१६) माहिती तंत्रज्ञाান

१७) माषाकौशल्य विकसन

वरील विषयसूची व्यतिरिक्त इतर नावीन्यपूर्ण विषयांचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील,

१८) पर्यावरण संरक्षण

१) आनंददायी शनिवार उपक्रमाची वैशिष्ट्ये :

१) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या टास्क क्र. ९२ मध्ये नमूद सूचनेनुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम शाळेत राबविण्यात येत आहे.

२) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमातील कृतींचा समावेश केलेला आहे.

आनंददायी शनिवार कृतिपस्तिका pdf download

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *