100+ महत्त्वाचे शालेय सुविचार परिपाठासाठी अत्यंत उपयुक्त शालेय सुविचार shaley suvichar good thought 

100+ महत्त्वाचे शालेय सुविचार परिपाठासाठी अत्यंत उपयुक्त शालेय सुविचार shaley suvichar good thought 

  • वचन देताना विलंब करा, पण पाळतांना घाई करा.
  • विद्या हे धन असे आहे की, दिल्याने वाढते आणि लपवून ठेवल्याने कमी होते.
  • सौंदर्य हे वस्तुत नसून पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते.
  • कला ही जीवनाची सावली आहे.
  • प्रसन्नता ही सर्व सद्‌गुणाची जननी आहे.
  • जीवन सुंदर करणेसाठी तिन गुणांची आवश्यकता असते, प्रेम, ज्ञान आणि शक्ती.
  • दुसऱ्यांचा चांगुलपणा पाहणेसाठी आपल्यात चांगुलपणा असावा लागतो.
  • प्रसंगाच्या सहाणेवर धैर्याला धार चढते.
  • उच्चारुन विव्दत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते. पं. नेहरु
  • स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
  • संयम हा सोन्याचा लगाम आहे, त्याचे पशुचा माणूस आणि माणसाचा देव होतो.
  • हास्य हे जीवनवृक्षाचे फुल आहे, परंतु आश्रू हे त्याचे फळ आहे.
  • उच्च शिक्षण त्यालाच म्हणावे की, जे प्राप्त झालेले लोक विनम्र, पारेकरी, सेवाभावी आणि कार्यतत्प.
  • जीवन हे एक फुल आहे आणि प्रेम हा त्यातील मध आहे.
  • नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश.
  • देव माणसात पाहवा, मातीच्या मुर्तीत नाही.
  • ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हेच खरे शिक्षण.
  • जो दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.
  • जगून मरण्यापेक्षा, मरुन जगण्यात मोठेपणा आहे.
  • जीवन म्हणजे विचार, अनुभव आणि श्रध्दा यांचे घनफळ आहे.
  • जीभ जिंकणारा जग जिंकतो.
  • जीवनातील अंधःकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
  • प्राप्तीच्या आनंदपेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो.
  • मित्राच्या मृत्युपेक्षा मैत्रिच मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
  • मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ आहे.
  • मनुष्य विचारी असेल, तत्वज्ञ बनतो. विकारी असेल ता बेताल बनतो.
  • शिक्षण म्हणजे आपल्या आज्ञानाचा वेध घेणारा प्रगत शोध होय.
  • लीन असावे पण दीन असू नये.
  • काटकसर ही वार्धक्यातील आरामखुर्ची आहे.
  • जो वेळेवर जय मिळवील तो जगावर जय मिळवील.
  • समता, स्वातंत्र आणि सहानुभूती यांनीच व्यक्ति विकास होतो.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • सत्य आणि न्याय याहून कोणताच धर्म मोठा नसतो. म. गांधी
  • काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत.
  • शब्दाचा घाव तलवारीच्या वारापेक्षा अधिक वर्मी लागतो.
  • अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा मधूर झरा वाहतो.
  • उपदेशक, विचारवंत, व्हा, पण आगोदर आचारवंत व्हा.
  • कृत्ती चटका लावणार असावी, देणार नसावी.
  • चारित्र्याच्या विकास हेच खरे शिक्षण. म. गांधी
  • कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भूत कार्य घडतात.
  • गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा.
  • चित्र ही हाताची कृती आहे. पण चरित्र ही मनाची कृती आहे.
  • सगळ्या गोष्टी हातातून निघून गेल्यावर जे उरते त्याला अनुभव म्हणतात.
  • शिक्षण म्हणजे शरीर व बुध्दी यांचा समतोल विकास. म. गांधी
  • जीवन फलासारखे असु द्या पण ध्येय मात्र मधमशीप्रमाणे ठेवा.
  • आधुनिक राष्ट्राच्या उभारणीसाठी शिक्षणासारखे कोणतेही प्रभावी साधन नाही. पंडित नेहरु
  • प्रयत्न हा परिस आहे. त्याचे स्पर्शाने नरकाचे नंदवन होते.
  • शिक्षणाला निती अणि चारित्र्याचे अधिष्ठान हवे. डॉ. राधाकृष्णन
  • वसन शरिराचे रक्षण करते तर व्यसन घराची राखरांगोळी करतो.
  • स्नहोचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपतीपेक्षा अधिक मोलाचा असतो.
  • शिक्षणाची मुळे कडू असली तरी त्याचे फळे मधुर असतात.
  • ग्रंथ हेच गुरु होत.
  • आपल्या हातून काही चुका घडल्यास आपल्यामुळे ज्यांना त्रास होईल त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करणे हा
  • मनाचा मोठेपणा आहे.
  • प्रेम, सेवा, त्या हेच राष्ट्र धर्माचे सूत्र आहे.
  • त्यागाने पापाचे मुद्दल फिटते, दानाने पापाचे व्याज चुकते.
  • निष्क्रिय महत्वकांक्षा म्हणजे अपयशाला आमंत्रण आहे.
  • ज्यांचावर आपल्याला मात करता येत नाही त्यांच्याशी हातमिळवणी करणेच श्रेयस्कार असते.
  • कोण कोणासारखा दिसतो यापेक्षा कोण कसोणासारखा वागतो याला अधिक किंमत आहे.
  • विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे.
  • पुस्तकासारखा मित्र नाही, ग्रंथासरखा गुरु नाही.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *