ध्वजारोहण व ध्वज फडकवणे यामधील फरक समजून घेऊया independence day republic day 

ध्वजारोहण व ध्वज फडकवणे यामधील फरक समजून घेऊया independence day republic day 

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे पूर्ण होत आहे. यंदा 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 79 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. संपूर्ण देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सरकारी शाळा तसेच खासगी शाळा, महाविद्यालय, सरकारी आस्थापने, कार्यालये व इतर ठिकाणी ध्वजारोहण म्हणजेच (Flag hosting) केल्या जाते. राष्ट्रधवज फडकवणे आणि ध्वजारोहण करणे यात नेमका काय फरक आहे. 15 ऑगस्टला ध्वज फडकवला जातो की ध्वजारोहण केले जाते.

ध्वजारोहण

15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणि त्यानंतर उघडून तिरंगा फडकवला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा वरती चढविला गेला होता म्हणून याला ध्वजारोहण इंग्रजीत flag hoisting असे म्हणतात.

ध्वज फडकवणे

26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज अगोदरच वर बांधलेला असतो नंतर दोन्ही द्वारे उघडून फडकवला जातो. याला झेंडा फडकवणे म्हणजेच flag unfurling असे म्हणतात. 26 जानेवारी रोजी भारतीय संविधान लागू झाले होते म्हणून या दिवशी राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकवतात.

कार्यक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्य दिनाला दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. तसेच जनतेला संबोधित देखील करतात.

प्रजासत्ताक दिनाला भारतीय सुरक्षा दलाच्या तिन्ही दलांची परेड आयोजित केले जाते. तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेशांची राजपथावर परेड तसेच विविध राज्यांची झाकी देखील प्रदर्शित केली जाते. यावेळी विविध देशांतील राष्ट्रपती पंतप्रधान यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्या जाते.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *