जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या कार्यभाराबाबत jilha parishad prathamik shala mukhyadhyapak

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या कार्यभाराबाबत jilha parishad prathamik shala mukhyadhyapak 

विषयः-जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या कार्यभाराबाबत.

संदर्भ:-1) आर.टी.ई. अॅक्ट 2009

2) ता. परतुर अंतर्गत मुख्याध्यापकांच्या कार्यभाराबाबत.

आवेशः-

उपरोक्त सेदर्भिय विषयानुषंगाने आपणास आदेशित केले जाते की, जिल्हा परिषद शाळांमधील ज्या शाळेचा पट 150 पेक्षा जास्त असेल त्याठीकाणी मुख्याध्यापक पद RTE-2009 अंतर्गत संदर्भ दि.30/09/2013 नुसार पद मंजुर करण्यात आलेले आहे. इतर शाळांना मुख्याध्यापक (उच्चश्रेणी) पद मुजूर नाही याबाबत तालुकांतर्गत मुख्याध्यापक पदाचे कार्यभराबाबत साशंकता आहे. याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करून अंमलबजावणी शैक्षणिक वर्षे 2015-16 पासून करण्यात यावी.

1) ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मु.अ. नी कर्तव्य सुची प्रमाणे कार्यभार सांभाळणे आपणावर बंधनकारक राहील परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.

2) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नाही परंतू पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर आहे त्याठिकाणी सेवाजेष्ठ पदविधराकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.

3) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक व पदवीधर पद मंजूर नाही. त्या ठीकाणी सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.

4) वरील 01 ते 03 बाबी व्यतीरिक्त स्थानीक पातळीवर अडचणी, समस्या असतील अशा ठिकाणी स्वतः गट शिक्षणाधिकारी यांनी ज्यांना शिक्षक / प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापकाच्या कारभाराबांबत स्वतंत्र आदेश निर्गमित वेळोवेळी केलेले असतील त्यांनी मुख्याध्यापकांच्या कर्तव्यसुचीप्रमाणे कार्यभार सांभाळणे संबधितावर बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.

याबाबत सर्व केंद्रप्रमुखांनी त्यांचे अंतर्गत सबंधित शाळांना एक प्रत देऊन आपण स्वतः लक्ष घालून पदभार सोपवावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास लेखी स्वरूपात सादर करावा तसेच शाळेच्या विकासाठी तसेच पर्यवेक्षण / सनियंत्रण/व्यवस्थापन / आर्थिक / शैक्षणिक / सामाजिक कार्य व्यवस्थित पार पाडणे अन्यथा नियमानुसार MCSR-1981 नुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावीत केली जाईल याची नोंद घ्यावी. मुख्याध्यापक कार्यभाराबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *