Agriculture-Updates

Government updates: लवकरच राज्यात कृषी धोरण (Agricultural Policy) येणार, अशी कृषी मंत्र्यानी (Minister of Agriculture) निर्देश दिली

Agriculture-Updates

राज्यात नवे कृषी धोरण येणार,कृषी मंत्र्यांनी दिली माहिती….

 

शेतकऱ्यांच्या समस्या दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

कृषी (Agriculture Scheme) योजनांच्या माध्यमातून गावात तसेच शेतकरी कुटुंबात नक्कीच बदल घडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कृषी आयुक्तालयात आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) च्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

(He was speaking at a review meeting of the Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project (POKRA) and the Balasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation Project (SMART) held at the Agriculture Commissionerate.)

 

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसमावेशक रणनीती तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले.

Land Records:

शेतकऱ्यांच्या समस्या ( Farmer’s Problem) जाणून घेऊन त्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजनांच्या परिस्थितीतही आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:https://updatesa2z.com/2022/08/important-decisions-of-narendra-modi-about-farming.html

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology in agriculture) वापर करून शेतीत  प्रगती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे जेणेकरून या यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरू शकतील.

कृषी प्रणालीच्या माध्यमातून कृषी योजनांची माहिती गावातील अंतिम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली. गावातील शेतकरी सुखी व्हावा, शासकीय योजनांचा लाभ थेट गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला केल्या.

 

गोडाऊन योजनेंतर्गत गावपातळीवर गोदामांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

गावात गोदाम असल्यास शेतमालाच्या साठवणुकीची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे या योजनेला गती द्यावी, अशी सूचनाही सत्तार यांनी केली.

कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचा (स्मार्ट) आढावा (Review of Agribusiness and Rural Transformation Project (SMART).

घेतानाना बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thakare) म्हणाले की, ग्रामीण भागातील उद्योजकता बळकट करण्यासाठी तसेच कृषी आधारित व्यवसायांची उभारणी आणि त्यांना अधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे जीवन नक्कीच बदलेल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. संचालक दशरथ तांबोळी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कृषी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.

(All the Divisional Joint Director Agriculture, District Superintendent Agriculture Officer of the state were present).

कृषी मंत्र्यांनी बैठकीत सांगितलेल्या काही ठळक बाबी -(Some of the salient points mentioned by the Agriculture Minister in the meeting)

हे पण वाचा: https://updatesa2z.com/2022/05/earn-money-from-farming-business-of-garlic.html

• राज्यात खते, बियाणे, कीटकनाशके, यांचा गुणवत्तापूर्वक पुरवठा करण्यात येईल.

 

• गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये खासगी कंपन्याचा सहभाग बंद करण्यात येणार आहे.

 

• पंतप्रधान पीक विमा योजनेच्या आढावा घेऊन त्रुटींचा केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

 

• पुण्यातील सुसज्ज कृषी भवनचे लवकरच पायाभरणी करण्यात येणार आहे.

 

• कृषीविषयक उपक्रमामध्ये येत्या १०० दिवसामध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 

• कृषी आयुक्ताची अडचणी समजून शासन निर्णय घेणार आहे.

 

• पुरेसे कर्ज वाटप व्हावे म्हणून सहकार विभागाला आदेश दिले आहे

 

• अतिवृष्टी झालेल्या भागात त्वरित पंचनामे करून भरपाई देण्यात येणार आहे.

 

• PM किसान योजनेला गती देण्यासाठी सहकार विभागाची मदत घेण्यात येणार आहे.

 

  1. • दुष्काळावर सहनशील व कीड रोगांना प्रतिकारक बियाणांच्या संशोधन वाढीसाठी भर देण्यात येणार आहे.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *