Polytical updates: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन……

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे 5.30am वाजेच्या सुमारास मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. उपचारादरम्यान मेटे यांचे निधन झाले.

राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे आज तारीख 1.4 ऑगस्ट सकाळी अपघाती निधन झालं आहे.

 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खोपली येथल्या बातम बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. त्यात मेटे हे गंभीर जखमी झाले होते.. मात्र, अपघातानंतर तासभर त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने केला आहे.. त्यानंतर त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये उपचार करण्यात आले..

 

उपचारदरम्यान मेटे यांची प्रकृती खालावत गेली व अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र, गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, हा अपघात झाल्याचे समोर येत आहे. कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती डोंगराच्या कपारीला धडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणाच्या विषयावर बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आपल्या काही कार्यकर्त्यांसह विनायक मेटे हे काल (शनिवारी) रात्रीच मुंबईकडे निघाले होते.. बीडमध्ये आयोजित विविध कार्यक्रम रद्द करून ते मुंबईला जात होते.

 

 

Leave a Comment

updates a2z