सॅलरी स्लिप किंवा पगार पत्रक कसे डाउनलोड करावे ? मोबाईलवर सॅलरी स्लिप डाऊनलोड करा सोप्या पद्धतीने how to download salary slip on mobile pagarpatrak download 

सॅलरी स्लिप किंवा पगार पत्रक कसे डाउनलोड करावे ? मोबाईलवर सॅलरी स्लिप डाऊनलोड करा सोप्या पद्धतीने how to download salary slip on mobile pagarpatrak download 

सॅलरी स्लिप किंवा पगार पत्रक कसे डाउनलोड करावे यासंबंधी माहिती आपण पाहणार आहोत

आपल्याला कोणत्याही प्रकारच्या लोनची आवश्यकता असेल तर सॅलरी स्लिप किंवा पगार पत्रकाची आवश्यकता असते किमान सहा महिने मागील पगार पत्रक द्यावे लागते ते पगार पत्रक ऑनलाईन डाउनलोड कसे करावे हे आपण पाहणार आहोत पगार पत्रक डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे तसेच यासाठी पासवर्ड व युजरनेम कोणता वापरावा यासंबंधी खालील माहिती आपण पाहूया

अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवर देखील आपण पगार पत्रक डाऊनलोड करू शकतो पगार पत्रक डाऊनलोड करण्यासाठी मोबाईलचा देखील वापर केला जाऊ शकतो मोबाईलवर पगार पत्रक कसे डाउनलोड करावे ते आपण यामध्ये पाहणार आहोत.

मोबाईल मध्ये पगार पत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप किंवा पायऱ्या पहा

सर्वप्रथम मोबाईलवर पगार पत्रक डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल मध्ये chrome वर जाऊन त्यावरील उजव्या कोपऱ्यातील तीन टिंबाला क्लिक करून यामध्ये डेस्कटॉप मोड ऑन करणे आवश्यक आहे.

➡️त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये SHALARTH असे टाईप करावे केल्यानंतर याला सर्च करावे यामध्ये  shalarth.maharashtra.gov.in या साईटला click करावे. 

➡️यानंतर यामध्ये युजरनेम पासवर्ड व कॅपच्या टाकून लॉगिन करावे लागेल

➡️यासाठी युजरनेम हा आपला शालार्थ आयडी (shalarth ID) असणार आहे तसेच पासवर्ड हा ifms123 असणार आहे सदर पासवर्ड हा by default आहे यामध्ये तुम्ही बदल करून घेऊ शकता परंतु सुरुवातीला लॉगिन करण्यासाठी हाच पासवर्ड वापरायचा आहे हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे

➡️त्यानंतर खाली जो कॅपच्या (CAPTCHA) दिसत आहे तो कॅपच्या व्यवस्थित टाकावयाचा आहे यानंतर सबमिट submit या बटनाला क्लिक करायचे आहे.

➡️यानंतर जो इंटरफेस आपल्यासमोर येईल त्यामध्ये ओल्ड पासवर्ड आणि न्यू पासवर्ड क्रिएट करायचा आहे.

➡️ shalarth.maharashtra.gov.in    पासवर्ड क्रिएट केल्यानंतर पुन्हा लॉगिन LOGIN करायचे आहे यामध्ये युजरनेम USERNAME म्हणजे शालार्थ आयडी टाकावा व नवीन क्रिएट केलेला पासवर्ड टाकायचा आहे.

➡️यामध्ये WORK LIST या शब्दाला क्लिक केल्यावर employee corner असे दिसेल याच्यापुढे employee pay slip असे दिसेल सदर टॅबला click करावे

➡️यानंतर इंटरफेस मध्ये month म्हणजे ज्या महिन्याची फ्लिप काढायची आहे तो महिना सिलेक्ट करावा त्यानंतर year वर्ष सिलेक्ट करावे यानंतर view salary slip या टॅबला क्लिक करावे

➡️आपली सॅलरी स्लिप अशा प्रकारे डाऊनलोड करावी आणि हे डाऊनलोड केलेली स्लिप आपल्या फाईल मॅनेजर मध्ये डाउनलोड या टॅब मध्ये उपलब्ध झालेली दिसेल.

➡️अशाप्रकारे मोबाईल मध्ये पगार पत्रक सॅलरी स्लिप डाऊनलोड करण्यासाठी वरील पायऱ्यांचा वापर करून अगदी काही क्षणांमध्ये आपली सॅलरी स्लिप डाऊनलोड करून घेऊ शकतो. धन्यवाद

 

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *