सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत rajiv gandhi vidhyarthi sanugrah anudan yojana
प्रस्तावनाः-
संदर्भ क्र.०१ व क्र.०२ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्यासाठी “राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना” नियमित स्वरुपात राबविण्यात येत आहे. सदर शासन निर्णयान्वये विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास अनुज्ञेय सानुग्रह अनुदान व यासाठी आवश्यक कागदपत्रे नमूद करण्यात आली असून याबाबतचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
संदर्भ क्र.३ अन्वये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना) (सर्व)/ शिक्षण निरीक्षक (योजना), बृहन्मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी रु.१२.०० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतुद करण्यात आली आहे. त्यापैकी दि.१५.०७.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पात्र ३९५ विद्यार्थ्यांकरीता रु.४.८१ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
संदर्भ क्र.६ अन्वये पात्र ८४ विद्यार्थ्यांकरीता रु.१.१३ कोटी इतक्या निधीची मागणी करण्यात आली आहे. सदर निधी वितरीत करण्यास नियोजन व वित्त विभागाने सहमती दर्शविली आहे. या अनुषंगाने सदर निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान या योजनेसाठी संदर्भ क्र.६ अन्वये नोंदविलेल्या मागणीच्या अनुषंगाने रु.१,१३,३८,७३८/- (अक्षरी रुपये एक कोटी तेरा लाख अडतीस हजार सातशे अडतीस फक्त) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. या संदर्भात होणारा खर्च “मागणी क्र. ई-०२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ८०, सर्वसाधारण, ८००, इतर खर्च, (०६) राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना (०६) (०२) राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना (कार्यक्रम) (२२०२ ३१०९) ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)” या लेखाशिर्षाखालील सन २०२५-२६ च्या मंजूर तरतूदीमधून भागविण्यात यावा. सदरचे अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आले आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे.
३. राज्य शासनामार्फत वेळोवेळी वित्त विषयक निर्गमित करण्यात आलेले विविध आदेश/नियम/शासन निर्णय वित्तीय नियमावली यांची अंमलबजावणी करुन उपरोक्त निधी आवश्यकतेनुसार मान्य निकषानुसार खर्च करण्यात यावा. ज्यावेळेस निधी प्रत्यक्ष खर्च करावयाचा असेल त्याच वेळी आहरीत करण्यात यावा. शासन लेख्याबाहेर बँक खात्यात हा निधी ठेवण्यात येऊ नये. संदर्भ क्र. ०१ येथील शासन निर्णयामधील तसेच, वित्त विभागाच्या संदर्भ क्र. ४ येथील परिपत्रकातील अटी व शर्तीचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.
४. शासनाच्या सूचनांनुसार उपरोक्त तरतुद खर्च करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. यासाठी आयुक्त (शिक्षण), पुणे हे नियंत्रक अधिकारी असल्याने त्यांनी सर्व आहरण व संवितरण अधिकारी असलेल्या शिक्षणाधिकारी (योजना) (सर्व) / शिक्षण निरीक्षक (योजना), बृहन्मुंबई यांना वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अटींची पूर्तता करून तरतूद वितरीत करण्याची दक्षता घ्यावी.
५. सदर शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.४२९/२५/१४७१, दि.०८.०७.२०२५ व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ७८८/व्यय-५, दि.१४.०७.२०२५ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७२४१६२४२८०४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.