“वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत vande mataram vardhapan din celebration state level committee
संदर्भ :- संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. ०७/१५० वर्ष “वंदे मातरम – गीत/२०२५/४१२ दिनांक २९.७.२०२५, दि. १.८.२०२५ व दि.७.८.२०२५
प्रस्तावना :
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेले “वंदे मातरम्” या गीतास स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडात ही अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. “आनंदमठ” या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तुतीचे प्रतीक असून स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य क्रांतीकारक यांना प्रेरणादायी ठरलेले आहे. त्यामुळे सदर गीतास स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. “वंदे मातरम्” या गीतास ७ नोव्हेंबर, २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टीने महत्वाच्या घटनेच्या निमित्ताने राज्यातील कौशल्य विद्यापीठ, आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “वंदे मातरम, गीतगायन, देशभक्तिपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम यांसारखे विविध उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
“वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील कौशल्य विद्यापीठ, आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करावयाच्या कार्यक्रमासाठी राज्यस्तरीय समिती खालिप्रमाणे गठीत करण्यात येत आहे:-
२. उपरोक्त प्रमाणे नमूद राज्यस्तरीय समिती सदरहू कार्यक्रम सुव्यस्थितरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन व नियंत्रण ठेवील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५०८१३१६२५०५७२०३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.