शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत matricpurva shishyavrutti yojana amalbajavani 

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत matricpurva shishyavrutti yojana amalbajavani 

संदर्भ- आयुक्तालयाचे आदेश क्रं. २१२८ दि.३०.७.२०२५

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांची अर्ज स्वीकृती व पडताळणी ऑनलाईन करण्यात येत आहे.

१.इ.९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्रपुरस्कृत) २. साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्रपुरस्कृत)

३.इ.५ वी ते ७ वी आणि इ.८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

४. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती

५. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क

६. सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता

वर नमूद सहा योजनांसाठीची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने अर्ज स्वीकृती आणि नुतनीकरणाची ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरु करण्यात येणार आहे. याबाबत आपणास अलाहिदा कळविण्यात येईल. तसेच याबाबतची सूचना ऑनलाईन पोर्टलवरही प्रसिध्द करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अर्ज स्वीकृती व पडताळणीकरिता ऑनलाईन प्रणाली सुरु झाल्यानंतर पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

१) वर नमूद क्रं.१ व २ या योजना केंद्रपुरस्कृत आहेत. यात शिष्यवृत्तीचा राज्य हिस्सा ४० टक्के वितरीत झाल्यानंतरच केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा वितरीत होतो. या दोन्ही योजनांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे राज्य व केंद्र हिस्सा असे २ टप्पे आहेत. तसेच या योजनांच्या शिष्यवृत्ती वितरणाबाबत केंद्र शासनाकडून वारंवार विचारणा होत असते. त्यामुळे या दोन्ही योजनांचे कामकाज प्रथम प्राधान्याने करण्यात यावे.

२) सन २०२३-२४ पासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्जाची स्वीकृती सुरु करण्यात आलेली आहे. त्याकरीता सर्वप्रथम शाळेची पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अद्याप पर्यंत ज्या शाळांची नोंदणी केलेली नाही अशा शाळांकरीता तात्काळ कॅम्पचे आयोजन करुन शाळांची नोंदणी प्राधान्याने १०० टक्के करण्यात यावी.

३) ऑनलाईन नोंदणी झालेल्या शाळांतील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तींसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची स्वीकृती ऑनलाईन पोर्टलवरच करण्यात यावी. सन २०२५-२६ करीता शासनाच्या युडायस प्लस प्रणालीवर उपलब्ध असणारी माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर माहिती अद्ययावत असल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करणे आवश्यक आहे. सदर माहितीशिवाय विद्यार्थ्याची आवश्यक ती उर्वरित माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये भरावी. तसेच सन २०२३-२४ व २०२४-२५

या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे सन २०२५-२६ करीता अर्ज नुतनीकरणाची कार्यवाही संबंधित मुख्याध्यापकांनी पूर्ण करावी, याबाबत जिल्हयातील मुख्याध्यापकांना आपले स्तरावरुन सूचित करावे.

४) सन २०२५-२६ पासून ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे बँक खात्याचा तपशील भरणेकरीता मुख्याध्यापक स्तरावर प्रणाली उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर बँक खात्याच्या तपशीलाकरीता विद्यार्थ्याचे बँक खाते हे आधार संलग्न व कार्यरत (Active) असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उपलब्ध अथवा सुरु नसेल अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या आई/वडिलांसोबतच्या संयुक्त बैंक खात्याचा तपशील पोर्टलवर भरण्यात यावा. पण संयुक्त बँक खात्याच्या बाबतीत प्रथम खातेदाराचे नाव म्हणून संबंधित विद्यार्थ्याचेच नाव असणे आवश्यक आहे आणि सह खातेदार म्हणून संबंधित विद्यार्थ्याच्या आई/वडिलांचे नाव असावे. कोणत्याही परिस्थितीत केवळ पालकांच्या बँक खात्याचा तपशील सदर पोर्टलवर भरु नये यावावत मुख्याध्यापकांना सक्त सूचना देण्यात याव्यात. कारण केवळ पालकांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही.

५) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना पडताळणीकरीता ऑनलाईन पाठविण्यात यावेत. संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांनी प्राप्त अर्जाची पडताळणी करुन परिपूर्ण व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूरीकरीता संबंधित जिल्हयाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांना ऑनलाईन पाठवावेत. अपूर्ण व त्रुटी असणारे अर्ज त्रुटीपूर्ततेकरीता संबंधित मुख्याध्यापकांना ऑनलाईन परत पाठविण्यात यावेत. अशा ऑनलाईन कार्यप्रणालीचावत संबंधित कार्यालयांना आपले स्तरावरुन अवगत करण्यात यावे.

६) सैनिकी शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेकरीताचे अर्ज संबंधित सैनिकी शाळेकडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील Desk १ लॉगीनवर ऑनलाईन पाठविण्यात यावेत. उचित कार्यवाहीनंतर Desk १ कडून परिपूर्ण व पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना ऑनलाईन पाठविण्यात येतील.

७) संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अथवा Desk १ यांचेकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाची जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद / सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी ऑनलाईन प्रणालीवर पडताळणी करावी.

८) पडताळणीअंती पात्र विद्यार्थ्यांची यादी पीडीएफ व एक्सेल फॉरमॅटमध्ये ऑनलाईन प्रणालीवरच उपलब्ध होईल. याबाबतची सुविधा सन २०२५-२६ पासून ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर यादीमध्ये शिष्यवृत्तीचे देयक कोषागार कार्यालयास अथवा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करण्यासाठी आवश्यक संपूर्ण तपशील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदर यादीचीच प्रिंट काढून प्रचलित पध्दतीने शिष्यवृत्तीची देयके सहाय्यक आयुक्त / जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे स्तरावर तयार करावीत.

९) शिष्यवृत्तीचे देयक पारित झालेनंतर ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध झालेल्या यादीचीच प्रिंट काढून शिष्यवृत्ती संबंधित विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करणेसाठी बँकेला पाठविण्यात यावी.

वर नमूद सुचनांचे काटेकोर पालन करुन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजुरी व वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *