दिनांक ०१/११/२००५ पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक ०१/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुनः तपासणी करण्याकरिता तपासणी समिती गठीत करणेबाबत shikshak karmachari juni penshan yojana
संदर्भ
: १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. समिती-२०२४/प्र.क्र.५९/टीएनटी-६ दिनांक १३.०८.२०२४
२. तपासणी समितीचा दिनांक ०३.१०.२०२४ रोजी शासनास सादर अहवाल.
३. आपले संघटनेचे पत्र दिनांक ०५.०८.२०२५.
उपरोक्त विषयी संदर्भीय दिनांक १३.०८.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक ०१/११/२००५ पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक ०१/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता आर्थिक भाराबाबत पुनः तपासणी करण्याकरिता आयुक्त, शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली “तपासणी समिती” गठीत करण्यात आलेली होती.
त्यानुषंगाने तपासणी समितीने उपरोक्त विषयाबाबतचा तपासणी अहवाल दिनांक ०३.१०.२०२४ रोजी शासनास सादर केलेला आहे. सबब, तपासणी समितीचा अहवाल शासनास सादर केलेला असल्यामुळे आपले निवेदन शासन स्तरावर सादर करण्यात यावे.