- अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यावर होणारी शिक्षा:
:
व्यक्तिच्या संमतीशिवाय किंवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार होय.बलात्कार हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. बलात्कार पीडितेला भयंकर अशा शारीरिक, मानसिक यातनांना तोंड द्यावे लागते.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे अधिक कडक करण्यात आलेत. त्यानुसार, सोळा (16)किंवा त्यापेक्षा कमी वर्षे वय असलेल्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्याला कमीत कमी २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्याची कायदा दुरुस्ती करण्यात आली आहे. आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासीची शिक्षा सुनावन्यात येते. कायदा दुरुस्तीनंतरची या प्रकारची देशातील ही पहिलीच शिक्षा असल्याचे सांगितले जात आहे.
बलात्काराच्या प्रकरणांमध्ये भादंविच्या ३७६ (३)मध्ये २०१८मध्ये कायदा दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार, १६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला कमीत कमी २० वर्षे आणि जास्तीत जास्त आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात यावी. या कलमांतर्गत झालेली राज्यातील आणि देशातील ही पहिलीच शिक्षा असल्याचा दावा केला जात आहे.
- हेही वाचा: पाहा: तेलाच्या किमतीत होणार पुन्हा वाढ!
- कोणता कलम लागू होतो:.
भारत देशात प्रत्येक कलमात गुन्हा आणि दंड सांगितलेला आहे. भारतात दंड संहितेमध्ये कलम- 376 हा बलात्कार गुन्हा म्हणून दाखल आहे.
वेगवेगळ्या स्वरूपाच्या बलात्कारासाठी वेगवेगळे कलम लागू होतात.
कलम 376 (i)- 16 वर्षाखालील मुलीवर केलेला बलात्कार.
कलम 376 (j)- संमती देण्यास सक्षम नसणारी महिलेवर केलेला बलात्कार
कलम 376 (k)- वर्चस्व किंवा नियंत्रणात ठेवता येणारी महिलेवर केलेला बलात्कार
कलम 376 (l)- मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व असणारी महिलेवर केलेला बलात्कार
कलम 376 (m)- बलात्कार करत असताना महिलेला भयंकर दुखापत किंवा विद्रुपी किंवा
जीविताला धोका निर्माण करणे
:
कलम 376 (n)- एकाच महिलेवर सतत बलात्कार
कलम 377- अनैसर्गिक संभोग
या गुन्ह्याकरिता 10 वर्षे सक्तमजुरी अथवा जन्मठेपेची शिक्षा होवू शकते आणि दंडाचीही तरतुद
आहे.
कलम 228 (ए) नुसार बलात्कारीत स्त्रीचे नाव गोपनीय ठेवणे बंधनकारक असून तिचे नाव जाहीर
केल्यास 2 वर्षे तुरूंगवास आणि दंडाची शिक्षा होवू शकते.
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 164 (ए) — महिलेच्या वैद्यकीय तपासणीला परवानगी आहे.
सी.आर.पी.सी. कलम 327(2) — नुसार गोपनीय पद्धतीने इन कॅमेरा पीडीत महिलेचा जबाब
नोंदविण्यात यावा.
कलम 376 (2 a ) — पोलीस ऑफिसरकडून करण्यात आलेला बलात्कार.
कलम 376(b) – कामाच्या ठिकाणी वरिष्ठ असण्याचा गैरफायदा घेवून केलेला बलात्कार.
कलम 376(c) – सशस्त्र सेनेच्या सदस्याकडून करण्यात आलेला बलात्कार .
कलम 376(d) – जेलमध्ये, रिमांडहोममध्ये कर्मचाऱ्यांकडून केलेला बलात्कार.
कलम 376(e) – रुग्णालयातील व्यवस्थापन किंवा कर्मचाऱ्यांकडून केलेला बलात्कार.
कलम 376(f) –नातेवाईक किंवा पालक किंवा शिक्षकाने किंवा विश्वासू किवा अधिकार असणारी व्यक्तीने
केलेला बलात्कार.
कलम 376(g) – जातीयवादी किंवा सांप्रदायिक हिंसाचारामध्ये केलेला बलात्कार, गैंग रेप (एका पेक्षा
अनेक पुरूषांनी केलेला बलात्कार)
कलम 376(h)- महिला गरोदर असल्याचे माहित असताना केलेला बलात्कार.
कलम 375 मध्येच हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, संभोगावेळी केवळ ‘पेनिट्रेट’ करणं एवढंदेखील बलात्कार मानला जाईल.
कलम 376 अंतर्गत बलात्कार प्रकरणात 10 वर्षं ते जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.