देशभक्तीपर मराठी गीते pdf स्वरूपात उपलब्ध indian independence day deshbhakti gite pdf available
राष्ट्रगीत
जन गण मन अधिनायक जय हे,
भारत भाग्यविधाता।
पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड उत्कल बंग,
विध्य, हिमाचल, यमुना, गंगा, उत्कल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे,
गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हो,
भारत भाग्यविधाता।
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय हे।
रवींद्रनाथ टागोर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वन्दे मातरम
वंन्दे मातरम् ! सुजला सुफलां । मलयज शीतलाम् सस्य श्यामलां । मातरम् । वंन्दे मातरम्।
शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम् फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिणीम् सुहासिनीम् । युमधुर भाषिणीम् । सुखदां वरदां मातरम् । वंन्दे मातरम ।
बंकिमचंद्र चटोपाध्याय
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे राष्ट्र देवतांचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रमायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
– ग.दि.माडगूळकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
झेंडा आमुचा प्रिया देशाचा
झेंडा आमुचा प्रिया देशाचा फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम
लढले गांधी याच्याकरिता टिळक, नेहरू लढली जनता
समरधुरंधर वीर खरोखर अर्जुनि गेले प्राण
करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम
भारतमाता आमुची माता आम्ही गातो या जयगीता
हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाण
करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम
या देशाची पवित्र माती जूळती आमुच्या मधली नाती
एक नाद गर्जतो भारता तुझा आम्हा अभिमान
करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम
गगनावरी आणि सागरतिरि सळसळ करिती लाटा लहरी
जय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगान
करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू
लढतिल सैनिक, लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू
देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू
हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू
ग. दि. माडगूळकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो॥
हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो ॥१॥
वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥
हातात हात घालून हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥
करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो ॥४॥
या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो ॥५॥
ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो ॥६॥
मंगल देशा पवित्र देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दाच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी,
निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी,
व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची मंगल वसती
जनस्थानिंची श्रीरघुनाथांची ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥
गोविंदाग्रज
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खरा तो एकची धर्म
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
– साने गुरुजी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हा देश माझा
हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे ॥ धृ ॥
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ॥ १
जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे ॥ २ ।
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ॥ ३ ॥ हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गे मायभू
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा; शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ? जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला !
मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाटरेषा बनते प्रयाग काशी !
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !
– सुरेश भट
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जय भारत
जय भारत देशा, तुझ्या चरणी, कोटी कोटी माझे नमन असो नाम तुझे विश्वात साऱ्या, नित्य नित्य हे उच्च वसो ।।१।।
हि जन्म भूमी ज्या रामकृष्णाची, त्या धर्म सत्याचे दुत आम्ही अन्याय चिरडल्या ज्या राज्यांनी, त्या शंभुशिवांचे सूत आम्ही स्वातंत्र मिळालं जया मुळे, त्या शूरवीरांना स्मरु आम्ही बलिदान प्राणांचे दिले जयानी, त्या त्यागांना जपू आम्ही
देश भक्तीची हि अविरत गंगा, जना जनात ठासून वसो नाम तुझे विश्वात साऱ्या, नित्य नित्य हे उच्च वसो ।।
तुझ्या कीतींची दिव्य पताका विश्वामध्ये फिरवू आम्ही तुझी परंपरा, तुझी संस्कृती, कणा-कणात पेरु आम्ही विश्व शांतीचा संदेश जगाला, पुन्हा नव्याने सांगु आम्ही मानवतेचा विराट धर्म वृक्ष, मना-मनात रुजवू आम्ही
जगता मध्ये शांती ज्योत ही लख-लखती सदैव दिसो नाम तुझे विश्वात साऱ्या, वित्य हे उच्च वसो ।।
जय भारत, जय भारत, जय भारत देशा… (२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला उठा राष्ट्रवीर हो
युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे मिळुनी सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला उठा उठा, चला चला
वायुपुत्र होऊनी धरु मुठीत भास्करा होऊनी अगस्तिही पिऊनी टाकू सागरा रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला उठा उठा, चला चला
चंद्रगुप्त वीर तो फिरुनी आज आठवू शूरता शिवाजीची नसानसात साठवू दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला उठा उठा, चला चला
यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला उठा उठा, चला चला