Healthy-tips

Healthy tips: जाणून घ्या, ड जीवनसत्व (D-vitamin) ची कमतरता असल्यास कोणकोणत्या समस्या जाणवतात….

 

Healthy-tips

 

आराम केल्यानंतरही वाटतो थकवा. ड जीवनसत्वाची (D vitamin) कमतरता…

ड जीवनसत्वामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते.

शरीरात ड जीवनसत्वाचा अभाव असल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

ड जीवनसत्वाच्या अभावाचा परिणाम त्वचेवरही जाणवतो.

सूर्यप्रकाश (sunshine) हे ड जीवनसत्वाचं (D vitamin) प्रमुख स्त्रोत आहे.

ड जीवनस्त्व (D vitamin) शरीराला पुरेसं मिळावं यासाठी तज्ज्ञ (Doctor’s ) रोज 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात (young summer) बसण्याचा सल्ला देतात. पण तज्ज्ञांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणजे शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता (Vitamin D deficiency)  निर्माण होते.

याबाबतचा अभ्यास सांगतो की जगभरात 1 बिलियन म्हणजे 100 कोटी लोकांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आहे. या कमतरतेमुळे 5  प्रकारच्या समस्या जाणवतात. या समस्या म्हणजेच ड जीवनसत्वाच्या (symptoms of Vitamin D deficiency)  कमतरतेची लक्षणं होयं.

 

ड जीवनसत्त्वाची (D vitamin)  कमतरता भासल्यास कोणकोणत्या समस्या जाणवत:

हेही वाचा:https://updatesa2z.com/2022/01/healthy-tips-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0.html

1.पुरेशी झोप घेतल्यानंतर, आराम केल्यानंतरही थकल्यासारखं वाटतं. ड जीवनसत्वामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर ड जीवनसत्व शरीरात कमी असल्यास ही ऊर्जा मिळत नाही आणि म्हणून झोप घेतल्यानंतर आणि आराम केल्यानंतरही थकल्यासारखं वाटतं.

2. केस गळणे हे ड जीवनसत्वाच्या कमतरतेचं मुख्य लक्षण मानलं जातं. केशतंतूच्या विकासासाठी ड जीवनसत्वाची गरज असते. त्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरता जाणवल्यास त्याचा केसांवर परिणाम होतो आणि केस गळायला लागतात.

3. हाडं मजबूत करण्यासाठी ड जीवनसत्वाची आवश्यकता असते. ड जीवनसत्व पुरेश्या प्रमाणात नसेल तर मात्र हाडं कमजोर होतात. हाडांमध्ये असह्य वेदना होतात. आहारातून शरीराला मिळणाऱ्या कॅल्शियमचं शोषण करण्यासाठीही ड जीवनसत्वाची आवश्यकता असते. या जीवनसत्वाच्या अभावी पाठ दुखते, हाता पायाचे स्नायू दुखावतात.

Healthy-Tips-Benefits-of-D-vitamin

4. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. त्यामुळे सारखी आजारपणं मागे लागतात. ड जीवनसत्वाच्या कमतरतेचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात.

ड जीवनसत्व (D vitamin) हे पुरेशा प्रमाणात शरीरात असलं तर ते जिवाणुंना (bacteria) नष्ट करतं. जिवाणुंच्या वाढीला रोखतं. त्वचा निरोगी राखतं. त्वचेची जळजळ दूर करतं. ड जीवनसत्वात जिवाणुविरोधी आणि ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म Antioxidant properties) असतात. म्हणूनच ड जीवनस्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात.

5. मूड चांगला आणि उत्साही ठेवण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात ड जीवनसत्वाची गरज असते. ते जर नसेल तर मूड जाणं, दुखी वाटणं, निराश वाटणं, औदासिन्य येणं अशा मानसिक समस्या जाणवू लागतात.

ड जीवनसत्व (D vitamin)  दूर करण्यासाठी काय करावे?

1. संत्र्यांच्या ज्यूसमध्ये (Orange juice 🥤) क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असलं तरी ड जीवनसत्वाची कमतरताही संत्र्यांचं ज्यूस प्यायल्यानं दूर होते. घरीच संत्रीचं ज्यूस करुन पिणं हा आरोग्यदायी पर्याय आहे.

 

हे पण वाचा:https://updatesa2z.com/2022/02/causes-and-diseases-of-obesity.html

 

2. गायीच्या दुधात (Cow milk) ड जीवनसत्व विपुल प्रमाणात असतं. तज्ज्ञांच्या मते लो फॅट दुधापेक्षा सायीचं दूध ( फुल क्रीम दूध) प्यायल्यानं शरीराला ड जीवनसत्व आणि कॅल्शियमही मिळतं.

 

3. दह्यामध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. रोज दही खाण्याचा कंटाळा येत असल्यास ताक पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

 

4. याशिवाय मश्रुम, बदाम, ब्रोकोली, पनीर, सोयाबीन, लोणी, दलिया (Mushrooms, almonds, broccoli, cheese, soybeans, butter, oatmeal) यातून ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतं.

 

5. ड जीवनसत्वाचा नैसर्गिक स्त्रोत असलेल्या सूर्यप्रकाशाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. शरीराला ड जीवनसत्व पुरेसं मिळण्यासाठी रोज 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात बसणं अनिवार्य आहे.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *