शिंदे सरकारचा शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय
राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्यातील तब्बल 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश सोमवारी (ता. 22) काढण्यात आले आहेत. पुण्यातील विन्सीस आयटी सर्व्हीस (आय) प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे या बदल्या करण्यात आल्या. या प्रणालीत जिल्ह्यांमध्ये साखळ्या तयार केल्याने मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या …